loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत २० मे रोजी केमिस्ट बांधवांचा संप; तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन सादर

संगलट (खेड)(प्रतिनिधी) - ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) यांच्या देशव्यापी बंदच्या हाकेला प्रतिसाद देत बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी दापोली तालुक्यातील सर्व किरकोळ (Retail) व घाऊक (Wholesale) औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर दापोली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने दापोली तहसीलदार कार्यालय तसेच दापोली पोलीस स्टेशन येथे संपाबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दापोली केमिस्ट असोसिएशनचे सचिव राजेश घोसाळकर, खजिनदार सैफ पठाण, विश्वास नागवेकर तसेच तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधव उपस्थित होते. या संपामागील प्रमुख मागण्यांमध्ये ऑनलाइन औषध विक्री बंद करणे, ई-कॉमर्स कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवास्तव सवलतींवर नियंत्रण आणणे आणि बनावट औषधांच्या विक्रीला आळा घालणे या मागण्यांचा समावेश आहे. संपादरम्यान अत्यावश्यक रुग्णसेवा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल केमिस्ट संघटनेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg