loader
Breaking News
Breaking News
Foto

मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप; उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर हे फाटक असल्याने दररोज शेकडो प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात असून, येथे तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे. ​रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार, गाडी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर साधारणतः १५ ते २० मिनिटे हे फाटक बंद ठेवले जाते. सावंतवाडी रोड स्थानकावर गाड्यांची ये-जा मोठी असल्याने दिवसातून अनेकवेळा हे फाटक बंद असते. परिणामी, फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रुग्णवाहिका, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला या विलंबाचा मोठा फटका बसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या फाटकाला रेल्वे स्थानकामार्फत एक पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. मात्र, हा रस्ता रेल्वे स्थानकाला सुमारे २ किलोमीटरचा वळसा घालून जातो. वाढते इंधन दर आणि अतिरिक्त अंतरामुळे वाहनधारक या वळसा मार्गापेक्षा फाटकावर थांबणे पसंत करतात. मात्र, यामुळे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. ​वाहनधारकांच्या मते, सावंतवाडी-शिरोडा हा मार्ग पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. फाटकामुळे होणारी ही कोंडी सोडवण्यासाठी येथे उड्डाणपूल (Flyover) बांधणे हाच एकमेव ठोस उपाय आहे. ​"रेल्वे प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन समन्वयाने उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे, जेणेकरून प्रवाशांची इंधन आणि वेळेची बचत होईल," अशी भावना स्थानिक वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. ​आता या ज्वलंत प्रश्नावर रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg