loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलगाव सातेरी पंचायतनचा त्रैवार्षिक पडली उत्सव

सावंतवाडी (प्रतिनिधी) - कोलगावचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानचा त्रैवार्षिक पडली उत्सव गुरुवार ७ ते ११ मे दरम्यान होत आहे. त्यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गुरुवार ७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता कुळघर चंदन धुरी यांच्या घराकडून तरंगकाठीसह वाजत गाजत श्री देवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम होईल. शुक्रवार ८ रोजी दुपारी २ वाजता श्रीदेवी सातेरी मंदिराकडून अंधार व तरंगकाठीसह चव्हाटा येथे श्री दिर्बाई देवीच्या भेटीसाठी प्रस्थान व त्याठिकाणी धार्मिक विधी मानपान व नवसफेड कार्यक्रम होतील. रात्री ९ वाजता महाप्रसाद व त्यानंतर श्री दिर्बाई देवी मंदिराकडून अंधार व तरंगकाठीसह चव्हाटा मंदिराकडे प्रस्थान व रात्री मुक्काम होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवार ९ मे रोजी सकाळी १० वाजता अंधारांच्याहस्ते धार्मिक विधीयुक्त पडली भरणे व त्यानंतर भाविकांच्या पडलीत ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ वाजता अंधारांना हाक मारणे, भाविकांची गाऱ्हाणी व नवस बोलणे, सायंकाळी ५ ते ७ दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री ८ वाजता आरोलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. रविवार १० मे रोजी सकाळी १० वाजता सर्व अंधाराना हाक मारणे व ओटी भरणे नवस बोलणे, सायंकाळी ४ वाजता अंधाराना हाक मारणे, सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर रात्री ८ वाजता सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचा (पिकुळे) नाट्यप्रयोग होणार आहे.

टाइम्स स्पेशल

सोमवार ११ रोजी सकाळपासून ओटी भरणे, सकाळी ११ वाजता सर्व अंधाराना हाक मारणे व रयतेला आशीर्वाद, ११ वाजता दादासाहेब सावंत (कोलगाव - पुणेकर) यांच्यावतीने महाप्रसाद, दुपारी २.३० वाजता अंधाराना हाक मारणे व नंतर पडली महादेवाचे केरवडे येथे प्रस्थान होईल. भाविकांनी पडली सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान कमिटीच्यावतीने व कोलगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg