loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्त्यावर बेकायदेशीर ड्रेनेज पाईपलाईन, कारवाईची मागणी

कर्जत (प्रतिनिधी) - कर्जत नगरपरिषद हद्दीतील मौजे भिसेगाव परिसरातील फातिमा चर्चमागे प्रथमेश डेव्हलपर्सच्या विकासकाने रहिवाशांच्या येण्या- जाण्याच्या रस्त्यावर बेकायदेशीर ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पोकलेन मशीनने खोदकाम सुरू करुन रस्त्याची दुर्दशा केली आहे. मोठ्या प्रमाणावर मातीचे ढीग रस्त्यावर उभे केले असून रहिवाशांना येणा-जाण्याचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे नागरिकांना येता जाताना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेले चार दिवसांपासून परिस्थिती तशीच आहे, तरी नगरपरिषद प्रशासनाने वेळीच लक्ष घालून प्रथमेश डेव्हलपर्सचे विकासक विरोधात कारवाईची करण्याची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg