लांजा (संजय साळवी) - रत्नागिरी जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी लांजा तालुक्यातील रवींद्र आकाराम कोटकर आणि विभागीय संघटकपदी केशव वासुदेव गुणे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत संघटनेचा भव्य जिल्हा मेळावा आणि नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील हे होते.
यावेळी संघटनेची नव्याने निवडण्यात आलेली कार्यकारी पुढीलप्रमाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र कोटकर, कार्याध्यक्ष महेश भाटकर, उपाध्यक्ष निलेश ठिक व विक्रांत बिवलकर, सचिव अतिष भागवत, खजिनदार संतोष सकपाळ, सहसचिव म्हणून श्रीराम बंदरकर व संतोष तांबे, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत थुळ, पुरुष जिल्हा संघटक अरविंद पड्याळ, पुरुष जिल्हा संघटक म्हणून अमर गोखले, महिला जिल्हा संघटक म्हणून सुमेधा वैद्य व रोशनी खडपे, महिला प्रतिनिधी म्हणून शलाका देसाई, श्रद्धा सरपोतदार, स्नेहा मोहिते, मृणाल ताले, जिविता गमरे, गंधाली गांधी यांची निवड करण्यात आली. तर कोकण विभागीय संघटक म्हणून केशव गुणे यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय वेल्हाळ पाटिल यांनी केले.




































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.