loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी-कोल्हापूर जोडणाऱ्या धवडकी-सांगेली राज्यमार्गाचे रुंदीकरण पूर्ण; संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी तालुक्यातील धवडकी ते सांगेली या मुख्य राज्यमार्ग १९० च्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून, याचे अधिकृत उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पहिल्या टप्प्यातील हे काम २ कोटी ७० लाख रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. या मार्गामुळे सह्याद्री पट्ट्यातील शिरशिंगे, कलंबिस्त, शिवापूर यांसारख्या दुर्गम गावांना विकासाची नवी दिशा मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना संजू परब म्हणाले की, "हा रस्ता दर्जेदार पद्धतीने तयार झाल्यामुळे आता या भागातून सावंतवाडी शहरात अवघ्या अर्ध्या तासात पोहोचता येईल. भविष्यात हा मार्ग मुंबई, गोवा आणि कोल्हापूरला जोडणारा पर्यटनाचा प्रमुख केंद्रबिंदू ठरेल."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​यावेळी उपतालुकाप्रमुख जीवन लाड यांनी सांगितले की, सांगेली ते शिरशिंगे-कलंबिस्त या दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकरच हाती घेतले जाईल. तसेच कोल्हापूरला जोडणाऱ्या पारगड मार्गे शिरशिंगे-कलंबिस्त मार्गासाठी विशेष प्रयत्न केले जातील. ​कार्यक्रमाला माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, वामन नार्वेकर, उपसरपंच सुरेश पास्ते, संतोष नार्वेकर, दीपक सांगेलकर, अभय किनळोसकर, संजय पालकर आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जमिनीसाठी सहकार्य करणारे मालक रमेश नाईक व वामन नार्वेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg