loader
Breaking News
Breaking News
Foto

जे. ई. ई. मेन्स 2026 परीक्षेत रोटरी अकॅडमी महाडच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा दैदिप्यमान यश

खेड (प्रतिनिधी) - माहे जानेवारी व एप्रिल 2026 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई. ई. मेन्स या द्वितीय फेरी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी अकॅडमी महाडच्या इयत्ता 12वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. जे.ई.ई मेन्स परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्लोक हरवंदे (97.89 पर्सेनटाईल) आर्या नाईक (96.79 पर्सेनटाईल), निहार जोशी (95.77 पर्सेनटाईल), सम्यक शिर्के (92.12 पर्सेनटाईल), यज्ञा जुजुम (84.43 पर्सेनटाईल), आरुष पाटील (84.09 पर्सेनटाईल) यांचा समावेश आहे. तसेच हे विद्यार्थी दि. 17 मे 2026 रोजी होणाऱ्या जे.ई.ई. ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. तसेच 4 विद्यार्थ्यांनी 90 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 5 विद्यार्थ्यांनी 85 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 7 विद्यार्थ्यांनी 80 पर्सेनटाईलपेक्षा पेक्षा अधिक गुण प्राप्त करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशस्वितेची परंपरा कायम राखली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इयत्ता 12वी नंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जे. ई. ई. मेन्स या परीक्षेमध्ये विद्यार्थी सर्वोच्च गुण मिळवून जे. ई. ई. अ‍ॅडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र होत असतात. तद्नंतर जे. ई. ई. अ‍ॅडव्हान्स या परीक्षेच्या अंतिम गुणांवर विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील इंजिनिअरिंग कॉलेज आणि आयआयटी, एनआयटी साठी पात्र ठरतात. यामध्ये रोटरी अकॅडमी महाडच्या विद्यार्थ्यांनी जे. ई. ई. मेन्स या द्वितीय फेरी परीक्षेत आपल्या शाळेतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन तसेच मेहनत, जिद्द व चिकाटीच्या बळावर यश प्राप्त केले.

टाइम्स स्पेशल

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मॅथ्स, केमेस्ट्री, फिजिक्स या विषयांचे शिक्षक, वर्गशिक्षक तसेच परीक्षा विभागातील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जे. ई. ई. मेन्स या द्वितीय फेरी प्रवेश परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg