सावंतवाडी (प्रतिनिधी) - आरोंदा रस्त्यावरील मळगाव घाटात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका इको कारचा भीषण अपघात झाला. धार्मिक सोहळा आटोपून परतणाऱ्या शहरातील शिरसाट कुटुंबाची कार थेट दरीत कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घाटीतील वळणावर समोरून येणाऱ्या वाहना धडक बसून चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने यात मोठी हानी झाली नसून झाडावरील गांधील मधमाशांनी हल्ला चढवल्याने काहीजण जखमी झालेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील शिरसाट कुटुंब गोवा येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. सायंकाळी ५ च्या सुमारास तेथून परतत असताना मळगाव घाटातील वळणावर दोन गाड्यांत अपघात झाला. मळगावच्या दिनेश जाणाऱ्या कार व सावंतवाडीच्या दिनेश येणाऱ्या इकोच्या धडकेत इकोवरील चालकाचा ताबा सुटल्याने करा रेलिंग तोडून थेट २० फूट खाली कोसळली. यातच झाडावर गाडी आदळल्याने गांजील माशांचे मोहोळ उठून अपघातग्रस्तांसह अनेक जण जखमी झाले. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवीत हानी झाली नाही. मात्र, यात गाडीतील प्रवाशांना गंभीर इजा झाल्या आहेत. गाडीतील रजत मंगेश शिरसाट (वय ६८), श्रीधर रंजन शिरसाठ (वय३०), जयश्री विश्वनाथ शिरसाठ (वय ६५), हर्ष महेश शिरसाठ (वय १८), उमा मंगेश शिरसाठ (वय ५६), मंगेश महेश शिरसाठ (वय ६०), रंजन शिरसाट (वय ६३) सर्व. राहणार सालाईवाडा सावंतवाडी हे सात प्रवासी जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून ते या अपघातात बालबाल बचावले. घटनास्थळी गाडी कोसळल्यानंतर गांजील माशांनी हल्ला केल्याने काहींनी इजा पोहचली.
अपघात घडल्यानंतर स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मधमाशांनी हल्ला चढवलेला असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावलेल्या युवकांनी जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरूच ठेवले. या भीषण अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, मायकल डिसोजा, विशाल बांदेकर, राजू राहुल, मनोज नार्वेकर, नारायण चव्हाण, बाळा नार्वेकर, शुभम कळसुलकर, सुधीर जडिये, सचिन हरमलकर, राजू परब, गणेश पेडणेकर आदींनी युद्धपातळीवर मदत कार्य केले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक लोहकरे, सुरेश पाटील, शिंगाडे, संभाजी पाटील, मोरबाळे आदी करत आहेत.





































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.