loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी खेड च्या वतीने खेड रेल्वे स्थानकावर निवेदन

खेड (दिलीप देवळेकर) - रत्नागिरी - दादर रेल्वेला, दादर स्थानकावरील थांबा काढून दिवे स्थानकापर्यंत थांबा देण्यात आला आहे. याच अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने खेड रेल्वे स्थानकावर निवेदन देण्यात आले. कोकण वासियांचे रेल्वेचे स्वप्न मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी साकार केले. आमचा कोकणवासीय ३५ रुपयांमध्ये दादर मुंबईला पोहोचू शकत होता. परंतु आज कोकण वासियांच्या हक्काची रत्नागिरी दादर पॅसेंजर गाडीचा दादर येथील थांबा काढून दिव्यापर्यंत करण्यात आला आहे. आणि याच थांब्यावरून दादर गोरखपूर गाडी सुरू करण्यात आली आहे. हा कोकण वासियांवर अन्याय आहे. तरी याची गंभीर दखल घेऊन दादर रत्नागिरी गाडी पूर्ववत सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने खेड रेल्वे स्थानक येथे निवेदन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी खेड नगरपरिषद मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर, गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली राकेश चव्हाण, भाजप शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद (दादू) नांदगावकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय तोडकरी, नगरसेविका आशाताई सनगरे, सिद्धेश पाटणे, सिकंदर बांगी, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले, अक्षय सनगरे, तुषार पवार यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg