loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली टाळसुरे गावाजवळील डोंगररांगांमध्ये शोधमोहीमेदरम्यान लेणीसदृश्य प्राचीन वास्तू आणि दगडी देवमूर्तीचा शोध, परिसरात उत्सुकता

दापोली (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील टाळसुरे गावाजवळील डोंगररांगांमध्ये ग्रामस्थांनी राबवलेल्या शोधमोहीमेदरम्यान लेणीसदृश्य प्राचीन वास्तू आणि दगडी देवमूर्तीचा शोध लागल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे. गावचे माजी सरपंच तथा दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांनी अलीकडेच ही शोधमोहीम राबवली. दापोली-खेड मार्गापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर, दाट जंगलाच्या परिसरात ही रचना आढळून आली. झाडाझुडपांनी वेढलेल्या या ठिकाणी ग्रामस्थांनी साफसफाई करत आत प्रवेश केला असता अरुंद मार्ग आणि गाळाने भरलेली जागा दिसून आली. या ठिकाणी दगडात कोरलेली एक सुबक देवमूर्तीही सापडली असून ती मारुती किंवा विष्णूची असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र संपूर्ण परिसर गाळाने भरलेला असल्याने अधिक उत्खननाची आवश्यकता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे, ही वास्तू गावातून वाहणाऱ्या नदीच्या काठावर असून हीच नदी पुढे पन्हाळेकाजी लेणी परिसराशी जोडली जाते. त्यामुळे या नव्याने सापडलेल्या वास्तूचा पन्हाळेकाजी लेण्यांशी काही संबंध आहे का, याबाबत अभ्यास होणे गरजेचे ठरत आहे. परिसरात कातळ शिल्पे असल्याचीही माहिती ग्रामस्थांनी दिली असून भविष्यात साफसफाई करून त्यांचे संवर्धन करण्याचा मानस आहे. या शोधामुळे टाळसुरे गाव पर्यटनाच्या नकाशावर झळकण्याची शक्यता व्यक्त होत असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा जयवंत जालगावकर यांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg