loader
Breaking News
Breaking News
Foto

जे. ई. ई. मेन्स २०२६ परीक्षेत श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वेरळचे उल्लेखनीय यश

खेड (प्रतिनिधी) - व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई. ई. मेन्स २०२६ या परीक्षेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज(सी.बी.एस.ई.) वेरळ येथील इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे. यामध्ये पारस झगडे (99.01 पर्सेनटाईल), सोहम म्हसकर (94.72 पर्सेनटाईल), सिध्दांत तिरपुडे (93.70 पर्सेनटाईल), अर्णव गोगेकर (93.49 पर्सेनटाईल), अरस्लान खान (88.36 पर्सेनटाईल), ऋतुराज जाधव (84.00 पर्सेनटाईल), ओवेस नागुठणे (86.18 पर्सेनटाईल), शताक्षी मयेकर (82.93 पर्सेनटाईल), प्रज्वल सुरवसे (81.07पर्सेनटाईल), त्रिथा कांबळे (75.47 पर्सेनटाईल), आदित्य मूर्ती (75 .35 पर्सेनटाईल) या विदयार्थांनी यश संपादन करुन प्रशालेच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव कोरले असून प्रशालेची अविरत यशाची परंपरा चालू ठेवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना JEE व NEET विभागप्रमुख विनोद सिंग, मयंक गुप्ता, अश्विनी कुमार, आदर्श गौरव, अंकित, शिवा, नागेंद्र सिंग, राजेश या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg