loader
Breaking News
Breaking News
Foto

हवामान बदलाने मच्छीमारी व्यवसाय ठप्प; हर्णे बंदरातील मासेमारी बोटी किनाऱ्याला

दापोली (शशिकांत राऊत) - समुद्रात वाहणाऱ्या उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाली आहे. हर्णे बंदरातून मच्छीमारासाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारी बोटींना गेल्या चार दिवसांपासून रोजच्या खर्चाइतकीही मासळी मिळेनाशी झाली आहे. शिवाय उलट वाऱ्यामुळे रापणाचे रोप तुटून मासेमारी करणाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हर्णे बंदरात मच्छीमारी करणाऱ्या मासेमारांनी मासेमारी न करता समुद्रातील परिस्थिती निवळेपर्यत बोटी किनाऱ्याला लावून ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे मासेमारीसाठी जिल्हयात दुस-या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. अशा या बंदरात सर्व प्रकारच्या साधारणपणे साडेआठशे च्या आसपास मासेमारी बोटी मासेमारीचा व्यवसाय करतात. मासेमारी व्यवसायामुळे कितीतरी जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे व्यवसाय या मासेमारीमुळे तेजीत चालतात. असा हा मासेमारी व्यवसाय कधी मानवनिर्मित अशा परप्रांतीयांच्या एलईडी, पर्ससीन नेट व फास्टर नौकांनी धुमाकूळ घातल्यावर धोक्यात येतो, तर कधी निसर्गातील हवामानाच्या बदलामुळे संकटात सापडतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसे गेल्या ४ दिवसापासून वातावरणातील हवामानाच्या बदलाचा फटका हा येथील मासेमारांना चांगलाच बसला आहे. मागील चार दिवसांपासून हर्णे येथील समुद्रात उत्तरेकडून वाहणा-या जोरदार वाऱ्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटींना जाळयात मासळीच मिळत नसल्याने बोटी मालकांच्या अंगावर खर्च पडत आहे त्यामुळे मासेमारांनी परिस्थिती निवळेपर्यत किनाऱ्यावर बोटी लावणे पसंत केले आहे. दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात अगदी दाभोळ, बुरोंडी, आडे, उटंबर, केळशी अशा आजूबाजूच्या गावातील मिळून साधारणपणे साडेआठशेच्या आसपास मासेमारी नौका मासेमारी व्यवसाय करतात. हर्णै गावात मासेमारांची मोठी वस्तीही आहे. शिवाय बाजूच्याच पाजपंढरी गावातील प्रत्येक घरातील लोक हे मासेमारी व्यवसायावरच आपला उदरनिर्वाह चालवतात.तेच त्यांच्या उदरनिर्वाहनाचे मुख्य साधन आहे. असा हा दर्यावर्दी मासेमार समुद्राच्या काठावर राहणारा मच्छीमार बांधव पूर्वीपासूनच पारंपरिक पद्धतीने मासेमारी व्यवसाय करत आले आहेत. या मच्छिमारांकडे ना वेगवान, ना पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या महागड्या किंमतीचा अदयावत बोटी येथील मच्छीमार लोक अजूनही पारंपरिक, छोट्या बोटींच्या साहाय्यानेच मासेमारी करतात.

टाइम्स स्पेशल

अशा या येथील मासेमारी करणा-या स्थानिक मासेमारांना गेल्या चार दिवसापासून समुद्रातील वातावरणात झालेल्या बदलांमुळे समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या मच्छिमारांना मासेच मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या बोटी समुद्र किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या आहेत. अशा या अचानकपणे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मच्छिमार चांगलाच अडचणीत सापडला आहे. समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासळी मिळत नाही. त्यामुळे मच्छीमार आर्थिक अडचणीत येवू लागला आहे. मासेमारी करणाऱ्या नौकाना इंधन, खलाशांचे रेशन पाणी भरून देणे त्याचबरोबर खलाशांचे आठवड्याचे पगार देण्याचा खर्च असतो. हा खर्चही सुटत नसल्याचे पाजपंढरी येथील रहिवासी आणि हर्णे बंदरात मच्छिमारी व्यवसाय करणारे मच्छिव्यवसायिक बोट मालक विष्णू तबीब यांनी सांगितले. त्यांच्या मते अजून किमान तीन दिवस तरी अशीच परिस्थिती राहील असा त्यांनी अंदाज वर्तवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg