loader
Breaking News
Breaking News
Foto

दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार हॉल तिकीट? तारीख जाहीर

मुंबई : फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावीच्या) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची हॉल तिकीट ऑनलाईन माध्यमातून 20 जानेवारी 2026 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांनी ही प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in, www.mahahsscboard.in वरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करावीत, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मंगळवापासून उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यानुसार इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची हॉल तिकीटं संबंधित माध्यमिक शाळांनी मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत.हॉल तिकीट छापताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये. छापील प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित शाळांनी आपल्या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

10 वीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे: 20 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 2 प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी) दुपारी 3 ते सायंकाळी 6 दुसरी किंवा तिसरी भाषा (जर्मन, फ्रेंच) 21 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 2 विविध व्यावसायिक/तांत्रिक विषय (उदा., मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन, कृषी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इ.) 23 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 2 दुसरी किंवा तिसरी भाषा (मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी) सकाळी 11 ते दुपारी 2 दुसरी किंवा तिसरी भाषा संयुक्त अभ्यासक्रम 25 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 2 दुसरी किंवा तिसरी भाषा दुपारी 3 ते सायंकाळी 5 दुसरी किंवा तिसरी भाषा संयुक्त अभ्यासक्रम 27 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 2 प्रथम भाषा इंग्रजी आणि तिसरी भाषा इंग्रजी 4 मार्च 2026 सकाळी 11 ते दुपारी 2 दुसरी किंवा तिसरी भाषा हिंदी सकाळी 11 ते दुपारी 1 दुसरी किंवा तिसरी भाषा संयुक्त अभ्यासक्रम 6 मार्च 2026 सकाळी 11 ते दुपारी 1 गणित भाग-1 बीजगणित अंकगणित (पात्र दिव्यांग उमेदवारांसाठी) 9 मार्च 2026 सकाळी 11 ते दुपारी 1 गणित भाग-2 भूमिती 11 मार्च 2026 सकाळी 11 ते दुपारी 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 सकाळी 11 ते दुपारी 1:30 शारीरिकशास्त्र आणि स्वच्छता (पात्र दिव्यांग उमेदवारांसाठी) 13 मार्च 2026 सकाळी 11 ते दुपारी 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 16 मार्च 2026 सकाळी 11 ते दुपारी 1 सामाजिक विज्ञान पेपर-1 (इतिहास आणि राज्यशास्त्र) 18 मार्च 2026 सकाळी 11 ते दुपारी 1 सामाजिक विज्ञान पेपर-२ (भूगोल)

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg