loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई महापालिकेत ठाकरेंचा महापौर? ठाकरेंच्या हाती हुकमाचे दोन एक्के

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांमध्ये आता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सर्वच पक्षांनी सुरू केल्या आहेत. २२ जानेवारीला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. सर्वांचे लक्ष मुंबईचा महापौर कोण होणार याकडे लागले आहे. बहुमतापर्यंत पोहोचलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. या पार्श्‍वभुमीवर मुंबई महापालिकेतील चकित करणारं गणित समोर आल असून तस घडल्यास ठाकरेबंधूंचा महापौर मुंबईत विराजमान होवू शकतो. ठाकरे बंंधूंच्याहाती दोन हुकमी एक्के आहेत. २२ जानेवारीला आरक्षणाची सोडत निघणार आहे. यामध्ये आरक्षण जर का अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झालं तर महापौर पदाची लॉटरी ठाकरेबंधूंनाच लागू शकते. सध्याच्या घडीला ठाकरेंकडे दोन हुकूमाचे एक्के असल्याचं चित्र आहे. कारण निवडणुकीपूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये २ जागा अनुसूचित जमाती अर्थात एसटी साठी राखीव आहेत. प्रभाग ५३ आणि प्रभाग १२१ हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दोन मतदारसंघात सर्वपक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले. अशा परिस्थितीत जर २२ जानेवारीला महापौरपदासाठी जी आरक्षण सोडत निघणार आहे, त्यावेळी महापौरपद जर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जाहीर झालं तर ठाकरेंना लॉटरी लागू शकते. त्यामुळे जसं उद्धव ठाकरे म्हणाले, त्याप्रमाणे जर देवाची इच्छा असेल तर महापौर ठाकरेंचा होऊ शकतो.

टाइम्स स्पेशल

प्रभाग ५३ आणि प्रभाग १२१ हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन्ही प्रभागात ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग ५३ मधून जितेंद्र वळवी यांनी बाजी मारली, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेचे अशोक खांडवेंचा पराभव केला. तर प्रभाग १२१ मधून प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला. प्रियदर्शनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या उदमेवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg