loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड - वाणीपेठ येथे गुरुवारपासून सार्वजनिक माघी गणेशोत्सव

खेड (वार्ताहर) : - शहरातील वाणीपेठ कला, क्रिडा व सांस्कृ‌तिक मंडळाच्या वतीने गुरुवार दि. २२ ते सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ पर्यंत सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष व खेड नगरपरिषदेचे नगरसेवक प्रेमळ चिखले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सार्वजनिक माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून विधीवत पूजनाचे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. रोज सकाळी ८ व रात्री ८ वाजता ' श्रीं ' ची विधीवत पूजा व आरती होईल. गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ११- ' श्रीं ' चे सवाद्य मिरवणुकीने आगमन व सकाळी ११:३० वाजता ' श्रीं ' ची स्थापना, शुक्रवार दि.२३ जानेवारी रोजी सायं. ६ ते ७ - महिलांसाठी आवर्तने, रात्री ८- साईलीला भजन मंडळाचे भजन, शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ९ - श्री सत्यविनायक पूजा, सायं. ७ वाजता ह.भ.प गणपत येसरे महाराज यांचे भजन, रविवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता खेड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांचा सत्कार समारंभ, सायंकाळी ७ ते ९- ब्रह्मवृंदांकडून आवर्तने, सोमवार दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उत्तरपुजा व त्यानंतर' श्रीं ' ची सवाद्य विसर्जन मिरवणूक सोहळ्याने या सार्वजनिक माघी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. तरी या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg