loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरगाव गणातून युतीतर्फे भाजपकडून ऍड. नयना पवार उमेदवारी जाहीर

चिपळूण (संतोष पिलके) - विधी व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऍड. नयना उदय पवार यांना भाजपातर्फे शिरगाव पंचायत समिती गणासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना-भाजप युतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना- भाजप युती झाली आहे. भाजपाने सोमवारी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये विधी व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या ऍडवोकेट नयना उदय पवार यांना शिरगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी जाहीर झाली आहे. नयना पवार या चिपळूण तालुका वकील संघ -उपाध्यक्ष, महाराष्ट्र नोटरी असोसिएशन- तालुका अध्यक्ष, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका आणि अधिवक्ता परिषद रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीत लिटीगेशन सहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळीत आहेत. विधी व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पवार यांचा जनसंपर्क व संघटन कौशल्य प्रबळ राहिले आहे. जनतेच्या अडीअडचणीची जाणीव आहे.

टाइम्स स्पेशल

याचीच दखल घेऊन भाजपाने ऍड. नयना पवार यांना शिरगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीबद्दल नयना पवार यांनी आनंद व्यक्त केला असून शिवसेना-भाजप युतीने दाखवलेला विश्वास राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली विजयाच्या रूपाने सार्थकी ठरवू आणि भविष्यात जनतेच्या हिताला प्राधान्य देऊ, अशी ग्वाही नयना पवार यांनी यावेळी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg