loader
Breaking News
Breaking News
Foto

रामेश्वर वाचन मंदिर आचरेच्या मालवण तालुकास्तरीय 'कथाकथन स्पर्धेत दिव्या गावकर प्रथम

मालवण (प्रतिनिधी) - श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत दिव्या नितीन गावकर -आचरा हिने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक - नंदिनी परेश बाईत - रामगड हिने पटकावला. तर तृतीय क्रमांक - नुर्वी गिरीश शेटगे -आचरा उत्तेजनार्थ उर्वी विनोद आचरेकर, आचरा श्रीश परेश तारी-आचरा धम्मतेजा पल्लव कदम -आडवली यांना गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य वैशाली सांबारी, दिपाली कावले, भिकाजी कदम, सांस्कृतिक समिती सदस्या कामिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी, भावना मुणगेकर, वर्षा सांबारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टाइम्स स्पेशल

यावेळी सहभागी सर्व स्पर्धकांना संस्थेने पुस्तके व रोख रकमेच्या स्वरूपात बक्षिसे दिली. स्पर्धेचे परीक्षण अनघा कदम शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल, आचरा व संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी केले. आभार कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी मानले तर सूत्रसंचालन ग्रंथपाल विनिता कांबळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री व स्वप्नील चव्हाण यांनी सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg