loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्रात गुजराती भाषेत निघाली सरकारी अधिसूचना; एकच खळबळ

मुंबई : पालघर जिल्हा प्रशासनाने 19 व 20 जानेवारी रोजी मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (एनएच–48) मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदीची अधिसूचना काढली आहे. मात्र या अधिसूचनेत मराठी व हिंदीबरोबर गुजराती भाषेचाही वापर करण्यात आल्याने टीका होऊ लागली आहे . राज्याची अधिकृत भाषा असताना गुजरातीचा समावेश का, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात असून जिल्हा प्रशासनावर टीका होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्याला खेटून असलेल्या गुजरातमधील प्रशासन त्यांच्या अधिसूचनेत शेजारधर्म पाळत नसताना जिल्हा प्रशासनाला गुजरातीबद्दल एवढा कळवळा का, असा संतप्त सवाल यानिमित्ताने स्थानिकांकडून विचारला जात आहे. वाहतूक नियंत्रण अधिसूचनेत गुजराती भाषेचा वापर केल्याने जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून उत्तर भारताच्या अनेक राज्यांतील वाहने मुंबईच्या दिशेने जातात. अधिसूचनेत गुजराती भाषेला महत्त्व दिल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदविला आहे. काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुजरातीतील अधिसूचनेचे पत्रक त्यांच्या समाज माध्यमांवर स्टेटसद्वारे सार्वत्रिक केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg