loader
Breaking News
Breaking News
Foto

पिढीगत संक्रमणाबाबत नितीन गडकरींचे वक्तव्य: ‘पुढील पिढीने पुढे यावं, जुनी पिढी योग्य वेळी मागे हटली पाहिजे’

नागपूर: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात बोलताना नेतृत्व बदल आणि पिढीगत संक्रमणाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं. “जेव्हा व्यवस्था सुरळीत चालू लागते, काम योग्य दिशेने पुढे जातं, तेव्हा जुन्या पिढीने मागे हटून पुढील पिढीला संधी दिली पाहिजे,” असा स्पष्ट सल्ला गडकरी यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गडकरी म्हणाले, “विदर्भात प्रचंड क्षमता आहे. कृषी, अन्नप्रक्रिया, लॉजिस्टिक्स, एमएसएमई, स्टार्टअप्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये इथे मोठ्या संधी उपलब्ध आहेत. योग्य नियोजन, पारदर्शकता आणि नव्या पिढीच्या ऊर्जेच्या जोरावर विदर्भाला देशाच्या औद्योगिक नकाशावर अग्रस्थानी नेणं शक्य आहे.”नेतृत्वाच्या भूमिकेबाबत बोलताना गडकरी म्हणाले, “नव्या पिढीकडे कल्पकता, तंत्रज्ञानाची जाण आणि वेगळी दृष्टी आहे. त्यांनी जबाबदारी घ्यावी, निर्णयप्रक्रियेत पुढे यावं. ज्येष्ठांनी मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी. व्यवस्था सक्षम झाली की जुन्या पिढीने सन्मानाने मागे हटणं हीच खरी लोकशाही संस्कृती आहे.”

टाइम्स स्पेशल

हा महोत्सव असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून खासदार, उद्योगपती, उद्योजक आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणून विदर्भातील औद्योगिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न आहे.या महोत्सवात विविध औद्योगिक प्रकल्प, गुंतवणूक संधी, स्टार्टअप सादरीकरणे, तसेच धोरणात्मक चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील तरुण उद्योजकांना थेट व्यासपीठ मिळावं, स्थानिक उद्योगांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी, हा या महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg