loader
Breaking News
Breaking News
Foto

जलजीवन मिशनचे काम अपूर्ण; फणसवणे नाक्यावर आमरण उपोषणाचा इशारा

संगमेश्वर (प्रतिनिधी) - फणसवणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुरवाडी, डिकेवाडी व सोनारवाडी येथील जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे २५ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना गेली तीन ते चार वर्षांपासून रखडलेली असून अद्यापही पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य सत्यवान गणपत विचारे यांनी २६ जानेवारी रोजी फणसवणे नाक्यावर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. या योजनेच्या कामाबाबत वारंवार माहिती मागूनही ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, देवरुख येथील अधिकाऱ्यांकडून कोणतीही समाधानकारक माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष साईटवर येऊन ग्रामस्थ व समिती सदस्यांसोबत पाहणी करावी, तसेच काम अंदाजपत्रकानुसार झाले आहे की नाही याची माहिती द्यावी, अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपअभियंता कांबळे यांनी ग्रामसभेत या योजनेची माहिती देणे बंधनकारक नसल्याचे उत्तर दिल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच याच ठेकेदाराकडून पूर्वीही निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा अनुभव असल्याने सध्याचे कामही दर्जाहीन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जर २० जानेवारीपूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष साईटवर येऊन ग्रामस्थांसमवेत पाहणी केली नाही, तर २६ जानेवारी रोजी फणसवणे नाका येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा ठाम इशारा सत्यवान विचारे यांनी दिला आहे.

टाइम्स स्पेशल

उपोषणाच्या कालावधीत काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्यासह आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार संगमेश्वर व संबंधित विभागांना निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg