loader
Breaking News
Breaking News
Foto

वशिष्ठी हेल्थकेअर आणि भ.क.ल. वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांच्यावतीने २१ जानेवारी रोजी आरोग्य तपासणी शिबीर

वरवेली (गणेश किर्वे) - वशिष्ठी हेल्थकेअर आणि भ.क.ल. वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर बुधवार दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत वशिष्टी हेल्थकेअर, उग्रया मेडिकल, मोहन सदाशिव संसारे कॉम्प्लेक्स शेजारी, श्रृंगारतळी बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. या आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये फिजीशियन (एम.डी. मेडिसन) स्त्रिरोग तज्ञ यांचा समावेश असणार आहे. या शिबीराची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांवर ३० ते ५० टक्के पर्यंत सूट असणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेह तपासणी आणि इसीजी मोफत करण्यात येईल. फिजिशियन मध्ये श्वसनाचे आजार, किडनीचे विकार, रक्तदाब मधुमेह, जुनाट आजार / सततचा त्रास, पोटाचा त्रास (अपचन, पित्ताचा त्रास), हृदयाचे आजार यांचा समावेश असणार आहे.

टाइम्स स्पेशल

स्त्रीरोगमध्ये योनी स्त्राव, मासिक पाळी संदर्भातील तक्रारी, PCOD / PCOS, वंधत्व गरोदर पणातील तपासणी, मूत्र मार्गातील संसर्ग, गर्भाशय / अंडाशय गाठी यांचा समावेश असणार आहे. वालावलकर रुग्णालयात मधुमेह रुग्णांसाठी आजारा संबंधी वैद्यकीय सल्ला तसेच, 'मधुसागर प्रकल्पांतर्गत' रुग्णालयात तपासण्या मोफत करण्यात येतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी वालावलकर रुग्णालयात योजने अंतर्गत मोफत उपचार मिळतील. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनवशिष्ठी हेल्थकेअर आणि भ.क.ल. वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांच्यावतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी ७६२०३५२६३२ येथे संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg