loader
Breaking News
Breaking News
Foto

खोंडे मधलीवाडी येथे गुरुवारपासून माघी श्रीगणेश जयंती उत्सव

खेड (दिवाकर प्रभु) - शहराजवळील भडगांव - खोंडे ग्रामपंचायत हद्दीतील खोंडे - मधलीवाडी येथे गणेश मंडळ, महिला व ग्रामस्थ मंडळ खोंडे मधलीवाडी यांच्यावतीने गुरुवार दि. २२ ते मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६ पर्यंत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती खोंडे मधलीवाडी येथील गणेश मंडळाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि. २२ ते २७ जानेवारी २०२६ पर्यंत रोज सायंकाळी ६ ते ७ यावेळेत खोंडे मधलीवाडी यांच्यावतीने हरिपाठ व आरती होणार आहे. गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १०:३० ते ११:३० या वेळेत वसंत बाबू लाले यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री गणेशाची स्थापना होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत होमहवन होईल. शुकवार दि. २३ जानेवारी रोजी दुपारी २ ते ४- श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ ते ७:३०- महाआरती होणार असून या महाआरतीचा मान रमेश ऊर्फ बावाशेठ चव्हाण, प्रमोदशेठ उसरे, विशाल साखरकर व ओंकारशेठ उसरे यांना देण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ७:३० ते रात्रौ ९:३० यावेळेत महाप्रसाद होणार आहे. शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता खोंडे- जोगळेवाडी ग्रामस्थ मंडळाचा हरिपाठ, रात्री ९ वाजता खोंडे जोगळेवाडी येथील अविनाश येसरे महाराज आणि सहकारी यांच्या साथीने मुंबई घणसोली येथील झी टॉकीज फेम ह.भ.प. सौ. धनश्री बोर्गे यांचे किर्तन होणार असून गवई म्हणून ह.भ.प. संजोग येद्रे व राजेंद्र जाधव तर मृदंगमणी हणून ह.भ.प. विशाल पातरटकर हे जबाबदारी सांभाळ‌णार आहेत.

टाइम्स स्पेशल

रविवार दि. २५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता खोंडे मधलीवाडी ग्रामस्थ मंडळाचे भजन व रात्री ११ वाजता खोंडे येथील सांस्कृतिक कार्यक्रम, सोमवार दि. २६ जानेवारी रोजी खोंडे मधलीवाडी ग्रामस्थ मंडळाचे भजन व रात्री ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, मंगळवार दि. २७ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत श्रीगणेशाची उत्तरपूजा झाल्यानंतर सायंकाळी ४:३० ते ६.३० या वेळेत मिरवणूक व विसर्जन सोहळ्याने या सार्वजनिक माघी श्रीगणेश जयंती उत्सवाची सांगता होणार आहे. तरी या उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे विनम्रपूर्वक आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg