loader
Breaking News
Breaking News
Foto

आज विषय समित्यांची निवडणूक! नायर, कीर, नागवेकर, साखरकर, सुर्वे याची वर्णी?

रत्नागिरी (वार्ताहर): रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी मंगळवार दिनांक २० जानेवारी रोजी निवडणुका पार पडणार आहेत. तसेच स्थायी समितीचीही निवडणूक होणार आहे. यामध्ये जुन्या आणि नवीन नगरसेवकाना संधी दिली जाणार असल्याचे संकेत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक शिवसेना भाजप महायुतीच्या माध्यमातून लढवण्यात आली. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या यशानंतर आता विषय समितीच्या निवडणुकीत कोणाकोणाला सभापती पदे मिळणार याकडे लक्ष लागले आहे. यावेळीही ना. उदय सामंत हे धक्का तंत्राचा वापर करतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हाती आलेल्या माहितीनुसार निमेश नायर यांना पाणी समिती, बंटी कीर यांना बांधकाम समिती, राकेश नागवेकर यांना स्वच्छता समिती, सोहेल साखरकर यांना नियोजन समिती, प्रीती सुर्वे यांना महिला व बालकल्याण समिती मिळण्याचे संकेत आहेत. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर हे शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती असतील. दरम्यान यावेळी स्थायी समितीसाठीही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, स्मितल पावस्कर, बाळू साळवी यांची नावे चर्चेत असून त्यापैकी दोघांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg