loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा तालुक्यात राजकीय हालचालींना वेग

म्हसळा – रायगड - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुका भाजपचे अध्यक्ष महेश पाटील यांनी त्यांचा समर्थकांसह मंत्री भरत गोगावले यांचा उपस्थितीत शिवसेना शिंदे गट मध्ये जाहीर प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महेश पाटील यांच्या समवेत भाजपचे अनेक ज्येष्ठ व प्रभावी पदाधिकारीही शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. यामध्ये गोंडघर गावाचे माजी सरपंच लहू तुरे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष समीर धनसे, प्रशांत महाडिक, गोविंद भायदे, शरद कांबळे, जाधव आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. एकाचवेळी मोठ्या संख्येने झालेले हे पक्षांतर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश पाटील यांना मेंदडी विभागातून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची उमेदवारी मिळण्याचे संकेत असून त्यामुळेच हा राजकीय निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेले हे पक्षांतर केवळ व्यक्तीगत निर्णय न राहता आगामी निवडणुकीतील रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. या घडामोडींमुळे म्हसळा तालुक्यातील भाजपला मोठा धक्का बसला असून तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद मात्र लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे.आगामी काळात आणखी काही पदाधिकारी पक्षांतर करणार का याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय हालचालींना पुढील काही दिवसांत आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी सभापती रवींद्र लाड, प्रवीण बनकर, म्हसळा तालुका संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, दीपेश जाधव, अक्रम साने, नगरसेवक सुफीयान हलदे, उपतालुका प्रमुख पदरथ आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg