loader
Breaking News
Breaking News
Foto

मध्य प्रदेश व महाराष्ट्र येथून २७ कोटींचे अमली पदार्थ जप्त, आंतरराज्य रॅकेट उघडकीस

ठाणे (प्रतिनिधी) : मुंब्रा पोलिसांकडून अमली पदार्थ विक्री आणि सेवन प्रकरणी दोघांना अटक करण्यासाठी सापळा रचताना २७ कोटी २१ लाख ७७ हजार ७५० रुपयांचा अमली पदार्थांचा साठा ठाणे पोलिसांनी जप्त केला. मध्य प्रदेशात जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात पाच जणांना अटक झाली आहे. अटकेत असलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाण्यात मुंब्रा येथे अमली पदार्थ विक्रीस येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीत केदार आणि गणेश जाधव यांच्या पथकाने कारवाई करुन बिलाल रुग्णालयाजवळ बासु सय्यद याला २३.५ ग्रॅम वजनाचा मेफेड्राॅन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला होता. त्याची चौकशी केली असता, मध्यप्रदेशातील दोघेजण पुन्हा एकदा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी रामसिंग गुज्जर आणि कैलास बलई या दोघांना ताब्यात घेतले.

टाइम्स स्पेशल

त्यांच्याकडून ३ किलो ५१५ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्यांनी हा अमली पदार्थ मध्यप्रदेशातील दोघांकडून घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या, पथकाने थेट मध्यप्रदेश गाठून मनोहर गुर्जर आणि राजु मन्सुरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ९ किलो ९५६ ग्रॅम वजनाचा एमडी जप्त केला. याप्रकरणात पोलिसांनी एकूण १३ किलो ६२९.५ ग्रॅम वजनाचा २७ कोटी २१ लाख ७७ हजार ७५० रुपयांचा एमडी जप्त करत पाचही जणांना पोलिसांनी अटक केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg