loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्ञानदानाचे पवित्र काम करत असताना गजानन मोघे गुरुजी यांची शाळेतच प्राणज्योत मालवली

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील गजानन मोघे यांनी कठीण परिस्थितीवर मात करत दहावीपासूनच देवळे हायस्कूलमध्ये पहिला येऊन शिक्षकी पेशा पत्करला जेणेकरून आपल्या ज्ञानाचा फायदा सामान्य कुटुंबातील मुलांना व्हावा, या उद्देशाने शिक्षण क्षेत्रात झोकुन दिले. मात्र दिनांक 19 जानेवारी रोजी ज्ञान दानाचे काम करत असताना चाफवली शाळा नंबर 1 येथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने शाळेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चाफवली शाळा नं 1 मध्ये स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झाल्यानंतर ज्ञानदानाचे काम करत असताना त्यांना अचानक हृदयविकारका झटका आला ,या झटक्यामुळे ते जाग्यावरच खुर्चीवर पडले. काय झाले हे मुलांना कळेना. या प्रकाराने मुले गोंधळून गेली आणि त्वरित इतर शिक्षकांना सांगितले. इतर शिक्षकांनी त्वरित रिक्षा बोलावून त्यांना उपचारासाठी देवळे येथे नेले. मात्र डॉक्टरानी इमर्जन्सी म्हणून पाली येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र तेथे त्यांना मयत घोषित केले.

टाइम्स स्पेशल

गजानन मोघे यांनी सतत दोन वर्ष चाफवली शाळेतील दोन विद्यार्थ्यांना नासा इस्त्रोसाठी निवड होण्यास मोठे योगदान दिले. देवळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेत ही ते सदस्य म्हणून काम करत होते. गजानन मोघे यांच्यासारख्या प्रामाणिक, मधाळवाणी, प्रेमळ, वामनराव पै यांच्या गुरु मार्गातील शांत, संयमी, हुशार, कवी, लेखक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक अशा व्यक्तीला देवळे पंचक्रोशी मुकली आहे. त्यांची शोक सभा उद्या 9.30 वा. देवळे हायस्कूल येथे आयोजित केली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील लोक उपस्थित होते. त्यांच्या जाण्याने परिसरात दुःखाचा डोंगर पसरला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg