loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर येथील विद्यार्थ्यांचे इचलकरंजी येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर येथील विद्यार्थ्यांनी मास्टर अबॅकस एज्युकेशन अकॅडमी, इचलकरंजी येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असुन संगमेश्वर मधून सर्व विध्यार्थी यांचे अभिनंदन करणेत येत असुन शुभेच्छांचा वर्षावं होत आहे. विविध वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली गणितीय क्षमता, वेग व अचूकतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली. अबॅकस स्पर्धा विद्यार्थ्यांना आपली गणितीय क्षमता वाढवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक उत्तम अवसर आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना आपली गणितीय क्षमता दाखवण्याची संधी मिळते आणि त्यांना प्रेरणा मिळते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही स्पर्धा १० मिनिटांची होती व या १० मिनिटाच्या वेळेत २०० गणितीय उदाहरणे दिली जातात व १० मिनिटात च्या वेळेत सोडवली जातात. यात सहभागी विध्यार्थी संगमेश्वर तालुक्यातील ४ शाळेतील न्यू इंग्लिश स्कूल कसबा,दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी, व जिल्हा परिषद शाळा - असुर्डे व माभळे जाधववाडी येथील असून या विद्यार्थ्यांना शिक्षण विरा इन्स्टिटयूट, संगमेश्वर येथे रविवार क्लास घेतले जातात. यातील या स्पर्धेतील युगा फटकरे, आराध्य पांचाळ, अर्णव जाधव, विवान भांगे, वीर घोळवे, ओम झगडे, सिद्धांई मोरे, अंशिका देशपांडे, गौरांगी घडशी, अर्णव जाधव, आराध्या आंबवकर, रुही आंबवकर, वेद बरगळे, निधी सावंत, शुभ्रा सुर्वे, ऋत्विक माळी या विद्यार्थ्यांनी चॅम्पियन, प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने आपले यश संपादन केले.

टाइम्स स्पेशल

या यशामुळे पालक, शिक्षक तसेच संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव व मार्गदर्शक शिक्षक विरा इन्स्टिटयूट चे संचालक धनाजी भांगे तसेच पुष्पा अबॅकस अकॅडेमी संचालिका सविता भन्साळी यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. हे या यशाचे प्रमुख कारण ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संगमेश्वरच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक वाढला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg