loader
Breaking News
Breaking News
Foto

अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संगमेश्वर बाजारपेठ बंद

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विमान अपघातात झालेल्या दुःखद निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद संगमेश्वर शहरातही उमटले असून या पार्श्वभूमीवर संगमेश्वर व्यापारी संघटनेने बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात व्यापारी संघटनेची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत अजितदादांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच या दुःखद घटनेचा सन्मान राखण्यासाठी आज संगमेश्वरची संपूर्ण बाजारपेठ दुपारी २ वाजल्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg