रत्नागिरी - तालुक्यातील वाटद जिल्हापरिषद गटात थेट दोन मैत्रिणी एकामेकांच्या विरोधात राजकीय रणांगणात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उतरल्या आहेत. वाटद जिल्हापरिषद गटाचे आरक्षण अनुसुचित जाती महिला पडले आहे. शिवसेना (शिंदे गट ) यांच्या पक्षाकडून सौ. उषा राजेश सावंत तर शिवसेना(उबाठा) यांच्याकडून सौ.संज्योत सुवेश चव्हाण या सैतवडे गावातील दोघी मैत्रिणी राजकिय रणांगणात उतरल्या आहेत. उषा सावंत या गुंबद गावच्या विद्यमान सरपंच आहेत तर संज्योत चव्हाण या सैतवडे गावच्या माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत. दोघी उच्चशिक्षित आणि फुले-शाहू-आंबेडकर वैचारिक उमेदवार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी उषा सावंत यांच्यावर तर शिवसेना(उबाठा) च्या नेत्यांनी संज्योत चव्हाण यांच्यावर विश्वास दर्शवत जिल्हापरिषद रणांगणात उतरवले आहे. यांचा प्रशासकीय अनुभव, काम करण्याची धडपड पाहता वाटद जिल्हापरिषद निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे, पण दोन मैत्रिणी रणांगणात असल्या तरी लढत ही अटीतटीची होईल यात शंकाच नाही. कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ताकदीने मेहनत घेत आहेत.
टाइम्स स्पेशल
राजापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार; मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा AI तंत्रज्ञानाचा वापर

























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.