loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू मांडवे धरणप्रश्नी भूमिपुत्र नितीन जाधव यांची भूमिका, २६ रोजी आंदोलन

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील न्यू मांडवे अपूर्णावस्थेतील धरण प्रकल्पाबाबत सुधारित सुप्रमावर अंतिम शासन निर्णय न झाल्यास प्रजासत्ताकदिनी पुकारलेल्या आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम राहणार असल्याची भूमिका भूमिपुत्र नितीन जाधव यांनी स्पष्ट केली आहे. धरण प्रकल्पस्थळी कोकण जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी दौरा करून नेमके काय साध्य केले, असा सवालही उपस्थित केला. आता माघार अजिबात नाही, अशी आक्रमक भूमिकाही घेतली आहे. १९८२ मध्ये न्यू मांडवे लघुपाटबंधारे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर १९९३-९४ मध्ये प्रत्यक्षात कामास प्रारंभ झाला. मागील ३२ वर्षापासून हा प्रकल्प रखडला असून सध्याची कामाची गती पाहता धरण नेमके किती वर्षांनी पूर्ण होईल, याची कोणतीही निश्चितता राहिलेली नाही. आजवर आंदोलने, उपोषणाचा मार्ग पत्करल्यानंतर ’लवकरच काम पूर्ण केले जाईल असे आश्वासने देत अष्टक्रोशीतील ग्रामस्थांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रकल्पाबाबतची पुढील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय आवश्यक असून प्रकल्पाच्या फाईलकडे दुर्लक्षच केले जात आहे. याचमुळे धरणप्रकल्प मार्गी लावण्यासह प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा मार्ग पत्करला असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. २६ जानेवारी रोजी धरण प्रकल्पस्थळी आत्मदहनाचा अवलंब केला जाणार आहे. या निर्णयाचे नियोजन देखील करण्यात आले आहे. २६ रोजी सकाळी १० वाजता न्यू मांडवे धरण प्रकल्पस्थळी प्रकल्पबाधित शेतकरी व अष्टक्रोशीतील ग्रामस्थ जमा होतील. सकाळी ११ वाजता प्रत्यक्षात सभेस सुरुवात होईल. दुपारी १२ वाजता पुढील निर्णय घेण्याची तयारी केली जाणार आहे. या सभेस येणारा प्रत्येकजण भूमिपुत्र म्हणूनच सहभागी होणार आहे. सभेच्या ठिकाणी मनोगते व्यक्त करताना आचारसंहितेचे नियम पाळूनच बोलण्याची परवानगी दिली जाणार आहे. सभेच्या ठिकाणी केवळ आत्मदहन याविषयावरच चर्चा केली जाणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg