loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा पंचायत समिती निवडणूक : खानवली गणातून शिवसेना उबाठा पक्षाचे विभागप्रमुख लक्ष्मण मोर्ये निवडणुकीच्या रिंगणात

लांजा,दि.२४ जानेवारी ( वार्ताहर) :- महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लांजा तालुक्यातील खानवली पंचायत समिती गणातून माजी उपसभापती लक्ष्मण सोनू मोर्ये हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचारासाठी गावागावातील शिवसैनिक झटून कामाला लागल्याचे चित्र आहे.लांजा तालुक्यातील गवाणे गट शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला राहिला असून या गटातून चेतन शांताराम दळवी हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. तर गवाणे गणातून शिवसेनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या सौ. पायल प्रशांत साळवी यांनी उमेदवारी दाखल केला आहे. आजवरच्या प्रचार मोहिमेत सक्रिय राहिलेल्या पायल प्रशांत साळवी यांनी आपला प्रचार नेटाने सुरू केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खानवली गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले लक्ष्मण मोर्ये गेली ३५ वर्ष सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वावर चालणारे निष्ठावान शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि शाखाप्रमुख म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. वीरगाव उपळे ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच ,पंचायत समिती सदस्य ते उपसभापती अशी उल्लेखनीय कारकीर्द असलेल्या लक्ष्मण मोर्ये यांनी गवाणे गणाचे शिवसेना पक्षाचे उपविभागप्रमुख , गवाणे गटाचे विभागप्रमुख अशी संघटनात्मक पदे भूषवली आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg