loader
Breaking News
Breaking News
Foto

२५ वर्षे महापौरपद सांभाळणार्‍या शिवसेनेला आता उपमहापौरपदावर समाधान मानावे लागणार

मुंबई (टाइम्स डेस्क)- आशिया खंडात सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ज्या मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे अशा महानगरपालिकेच्या महापौरपदावर भारतीय जनता पार्टीने दावा केला आहे. कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे २५ वर्षे महापौरपद सांभाळणार्‍या शिवसेनेला आता उपमहापौरपदावर समाधान मानावे लागणार आहे. शिंदेंच्या सेनेला उपमहापौरपदावरच बसावे लागणार आहे. २५ वर्षानंतर पहिल्यांदाच यंदा महापौरपद भाजपाकडे गेले आहे. शिवसेना एकसंघ असते तर आज महापौर शिवसेनेचाच असता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महापालिकेत महापौरपद द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे म्हटले जाते. शिंदे सेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महापौरपदाची मागणी करण्यात आली होती पण ही मागणी भाजपाने नाकारल्याचे खात्रीशीरवृत्त सूत्रांनी सांगितले. मुंबईचे महापौर हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असणार आहे. शिंदे शिवसेनेकडून महापौरपदासाठी समृद्धी काते, अश्‍विनी कातेकर, शैला लांडे यांची नावे चर्चेत आहेत तर स्थायी समिती शिक्षण समितीसाठी तृष्णा विश्‍वासराव, संध्या दोषी, अंजली नाईक यांच्यासारख्या आक्रमक नगरसेवकांंचा विचार केला जाणार असल्याची शक्यता आहे.

टाइम्स स्पेशल

मुंबई महानगरपालिकेत भाजपा ८९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ६५, शिवसेना एकनाथ शिंदे गट २९, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस २४, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६, एआयएमआयएम ८, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार ३, समाजवादी पक्ष २ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार १. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी ११४ जागांची गरज आहे. भाजपा सेनेचे एकूण नगरसेवक संख्या ११८ इतकी आहे. त्यामुळे सत्ता भाजपा-शिवसेनेची येणार हे निर्विवाद सत्य आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg