loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे महापालिकेची पाणी बिल वसुलीसाठी धडक कारवाई सुरू

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेने पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेतली असून जे नागरिक पाणापट्टी भरणार नाही अशा थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करणे, मीटर रुम सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये (दंड/व्याज) 100 टक्के सूट लागू करण्यात आली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावर 100 टक्के इतकी भरीव सवलत असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून थकीत पाणीबिल भरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

जे नागरिक आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करुन नळ संयोजन खंडीत करणे, मिटर रुम सिल करणे व पंप जप्ती कारवाई सुरू आहे. तरी नागरिकांनी पाणी बिल भरुन कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg