loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचा आदर्श, वडिलांचे त्यांच्या आज्ञेनुसार देहदान

रत्नागिरी : कै. अच्युत शिवराम आठल्ये (वय – ८९ वर्षे), राहणार – गुरुराज हाउसिंग सोसायटी, उद्यमनगर, रत्नागिरी यांचे दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. हे या महाविद्यालयातील १७ वे मरणोत्तर देहदान आहे.तत्पूर्वी दि. 27/01/2026 रोजी मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. कै. अच्युत आठल्ये हे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांचे वडील होते. तसेच त्यांची सून डॉ. रश्मी आठल्ये या जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कै. अच्युत आठल्ये यांचा जन्म दिनांक १३ जुलै १९३७ रोजी झाला असून त्यांचे मूळ गाव शिपोशी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी असे आहे. त्यांनी एल.आय.सी. (LIC) मध्ये सलग ४० वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. वाचनाची त्यांना अत्यंत आवड होती. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी विविध वाचनालयांना अनेक पुस्तके भेट दिली होती. समाजकार्याची आवड, साधे जीवन व विचारशील व्यक्तिमत्त्व ही त्यांची ओळख होती. सदर मरणोत्तर देहदान प्रसंगी कै. अच्युत आठल्ये यांची मुलगी, जावई, नातेवाईकांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे, तसेच जिल्हा परिषद, रत्नागिरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

ही संपूर्ण देहदान प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव, तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, राज पेडणेकर व श्रेयस जोशी यांनी देहदान प्रक्रियेत सहकार्य केले. कै. अच्युत आठल्ये यांच्या या मरणोत्तर देहदानातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत होणार असून, त्यांचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg