loader
Breaking News
Breaking News
Foto

बांधतिवरे एरंडीवाडी येथे माघी गणेशोत्सवाचे आयोजन

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील बांधतिवरे एरंडीवाडीत श्री सिध्दिविनायकाचे मंदिर आहे. या मंदिरात गुरुवारी २२ जानेवारी २०२६ रोजी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या माघी गणेशोत्सवानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडाविषयक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमामध्ये गुरुवारी २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठिक ८ वाजता अभिषेक, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता आरती व तिर्थ प्रसाद, दुपारी १.३० ते दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान महाप्रसाद, दुपारी २.३० वाजता महिलांसाठी खास हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या कालावधीत लहान मुलांचे विविध कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आरती, सांय. ७.३० ते रात्रौ ९ वाजता सत्कार समारंभ त्यानंतर रात्रौ १० वाजता स्वरगंध युवा भजनी मंडळ मौजे कांबळे तर्फे बिरवाडी, महाड जिल्हा रायगड विलासबुवा देशमुख यांचे शिष्य रायगड भूषण संजय चंद्रकांत घाडगेबुवा आणि राजापूर पांगरे येथील निनादेवी प्रासादिक भजन मंडळ अनिल सावंतबुवा यांच्या जंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

टाइम्स स्पेशल

माघी गणेशोत्सवानिमित्त बांधतिवरे एरंडीवाडीतील श्री सिध्दीविनायकाचे दर्शन सुख घ्यावे त्याचबरोबर आयोजित केलेल्या या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि माघी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशाप्रकारचे आवाहन दत्ताराम जगदाळे आणि सहकारी यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg