loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोलीत ‘उबाठा’ला मोठे खिंडार; विलवडे केसरीसह शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उबाठा (ठाकरे) गटाला जबर धक्का देत, विलवडे , केसरी परिसरातील शेकडो शिवसैनिकांनी शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे आंबोली मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे पारडे जड झाले असून उबाठा गटाची मोठी पडझड झाली आहे. ​शिंदे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये उबाठा गटाचे उपतालुकाप्रमुख सोनू दळवी, विलवडे विभागप्रमुख देवेंद्र सावंत, शाखाप्रमुख नंदकिशोर दळवी, संदीप दळवी, बाळा दळवी यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. जिल्हाप्रमुख संजू परब आणि नेते राघोजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सौ. सुप्रिया दिनेश गावडे निवडणूक लढवत आहेत. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे त्यांची ताकद दुपटीने वाढली असून मतदारसंघात विजयाची लाट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या मतदारसंघात भाजपने शोभा गावडे यांना 'एबी फॉर्म' दिल्याने संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे. खासदार नारायण राणे यांनी याआधी शिवसेनेला जाहीर केलेल्या जागांवर भाजपने पुन्हा हक्क सांगितल्याने युतीत काहीशी अस्वस्थता आहे. मात्र, तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

टाईम्स स्पेशल

"खासदार नारायण राणे यांनी हा मतदारसंघ शिंदे शिवसेनेसाठी सोडला असून, त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. आंबोली जिल्हा परिषद निवडणूक शिवसेनाच लढवणार आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही," असा निर्धार गावडे यांनी व्यक्त केला. आगामी काळात आंबोली मतदारसंघात आणखी काही मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याचे चित्र पाहता सुप्रिया गावडे यांची बाजू भक्कम दिसत असून, पुढील काही दिवसांत येथील राजकीय घडामोडी अधिक वेगवान होण्याची चिन्हे आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg