loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली-दाभोळ मार्गावर टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात; तिघे अल्पवयीन तरुण जखमी

संगलट, खेड(इक्बाल जमादार) - दापोली-दाभोळ राज्य महामार्गावर चिखलगाव येथील सृष्टी हॉलिडे होम्सजवळ आयशर टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत तीन अल्पवयीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने न देण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गजानन गुरव हे आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्रमांक MH 12 SX 9529) घेऊन दापोलीकडून गुहागरच्या दिशेने जात होते. सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास चिखलगाव नजीक समोरून येणाऱ्या एका दुचाकीने (क्रमांक MH 01 EH 3060) टेम्पोच्या उजव्या बाजूच्या टायरला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आर्यन संदीप सोलकर, सौरभ सतीश सोलकर आणि सागर संदीप जाधव हे तिघेही जखमी झाले आहेत. हे तिन्ही तरुण १६ वर्षांखालील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

या घटनेची माहिती मिळताच दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, विनापरवाना आणि कमी वयातील मुलांच्या हाती वाहने देणे धोक्याचे असल्याचे म्हटले आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना कायद्याने परवानगी मिळेपर्यंत वाहने चालवू देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी सपोनि गणेश दौलत कादवडकर अधिक तपास करत असून दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg