loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला

संगमेश्वर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे जोरदार प्रचार सुरू आहे. मुचरी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार माधवी मनोहर गीते तसेच माभळे पंचायत समिती गणाचे उमेदवार सुहास मायंगडे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार केला. याच पार्श्वभूमीवर संगमेश्वर बाजारपेठेतही त्यांनी भेट देत व्यापारी, नागरिक आणि मतदारांशी संवाद साधला. विकासकामांचा आढावा मांडत आगामी काळात लोकहिताचे निर्णय घेण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रचार दौऱ्यात त्यांच्यासोबत संजय कदम, विवेक शेरे, मंदार खातू, ओंकार भिडे, अभि खातू, समीर आंब्रे, मधुर आंब्रे, समीर रहाटे, संतोष बोले, सागर बोले, स्वप्नील शेट्ये, अनुप प्रसादे, आर्या मयेकर, नम्रता शेट्ये तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. घरोघरी भेटी, बाजारपेठेतील प्रचार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून शिंदे शिवसेनेच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg