loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार; मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा AI तंत्रज्ञानाचा वापर

राजापूर : मुंबई–गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील कोंडये पुलावर शनिवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुण पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसल्याने राजापूर पोलिसांनी आता AI तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. नुकतेच रत्नागिरी पोलिसांनी स्वतःचे raids ऍप नावाने तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्या आधारे मृत तरुणाचे वेगवेगळे फोटो तयार झाले असून पोलिस मृत तरुणाचा शोध घेत आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सविस्तर माहिती अशी की, संबंधित तरुण रात्रीच्या सुमारास कोंडये पुलावरून पायी जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तरुण रस्त्यावर दूर फेकला गेला. डोके व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तसेच महामार्गावरील काही वाहनचालक घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी विकसित केलेल्या AI ॲपचा वापर करण्यात आला आहे. या AI तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत व्यक्तीचे विविध शक्य असलेले फोटो तयार करण्यात आले असून, त्याद्वारे ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मृत तरुणाची ओळख पटवणे सुलभ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अपघात घडवून पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, सर्व शक्य दिशांनी तपास सुरू आहे. या मृत तरुणाबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ राजापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg