loader
Breaking News
Breaking News
Foto

अमेरिकेत काहीतरी भयंकर घडतेय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाची उड्ढाणानंतर काही मिनिटात आपत्कालीन लँडिंग

न्युयोर्क :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेतून रवाना झाल होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाने दावोसकडे उड्ढाण घेतली आणि मोठ्या घडामोडी घडल्या आणि थेट काही मिनिटात हे विमान पुन्हा अमेरिकेत परतले. ज्यामुळे जगात मोठी खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावोसचा नियोजित दाैरा होता. गेल्या काही दिवसांपासून या दाैऱ्याची तयारीही सुरू होती. मात्र, अचानक असे काही घडले की, थेट त्यांना काही मिनिटाच अमेरिकेत परतावे लागले. सध्या अमेरिकेचा इराण आणि ग्रीनलँडसोबतचा तणाव चांगलाच वाढला आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते. इराण आणि ग्रीनलँडकडून युद्धाची तयारी सुरू आहे. जर अमेरिकेने हल्ला केलाच तर आम्ही देखील सडेतोड उत्तर देऊ अशी भूमिका दोन्ही देशांची आहे. त्यामध्येच काही वेळापूर्वी इराणने थेट डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी देत म्हटले की, आमच्या नादी लागू नका… नाही तर अख्ये जग आम्ही नष्ट करू…

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डोनाल्ड ट्रम्प या महत्वाच्या घडामोडी दरम्यान थेट स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले होते. मात्र, उड्डाणानंतर थोड्याच वेळात त्यांच्या एअर फोर्स वन या विशेष विमानात बिघाड झाल्याचे कारण देत ते परतले. याबाबत व्हाईट हाऊसने देखील माहिती दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान तात्काळ मेरीलँडमधील जॉइंट बेस येथे उतरवण्यात आले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या विमानाने दावोसकडे रवाना होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg