loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुशौर्य बुदधिबळ स्पर्धेचा विजेता ठरला बाळकृष्ण पेडणेकर

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - अखिल भारतीय विदयार्थी परिषद, सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या सिंधुशौर्य जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचा बाळकृष्ण पेडणेकर पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. अभाविपने स्क्रीन टाईम ते ॲक्टिविटी टाईम या उपक्रमांतर्गत कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविदयालयात जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत जिल्ह्यातील सव्वीस विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन महाविदयालयाच्या प्राचार्या डाॅ.स्मिता सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, अभाविपचे दिग्विजय पवार, वरद प्रभू, आदि मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रास्ताविकात दिग्विजय पवार यांनी स्पर्धा आयोजनामागील संकल्पना स्पष्ट केली. विदयार्थ्यांना स्क्रीन टाईमकडून ॲक्टिविटी टाईमकडे वळवण्याचा उददेश असल्याचे ते म्हणाले. डाॅ.स्मिता सुरवसे मॅडम यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना बुदधिबळ हा खेळ आपल्या आवडीचा असल्याचे सांगितले. त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देताना अभाविपच्या उपक्रमाचे कौतुक केले. पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र वितरण दिग्विजय पवार, कौस्तुभ पेडणेकर, राजेंद्र तवटे, अथर्व श्रृंगारे, वरद प्रभू, बगळे, रामाणे, भरडकर, आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बाळकृष्ण पेडणेकर याने पाच राऊंड्समध्ये चार राऊंड्स जिंकून एक बरोबरीत सोडवून साडेचार गुण मिळवले. बाळकृष्णने पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. बाळकृष्णला गोल्ड मेडल, प्रशस्तीपत्र, रोख रक्कमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक वरद तवटे आणि तिसरा क्रमांक प्रथमेश रामाणे यांनी मिळवला. त्यांना अनुक्रमे सिल्वर आणि ब्राँज मेडल, प्रशस्तीपत्र, रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात आले. सर्व स्तरातून बाळकृष्णचे कौतुक करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg