वैभववाडी (संजय शेळके) - वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत एक जिल्हा परिषद बिनविरोध झाली असली तरी दोन जिल्हा परिषद गटामध्ये दुहेरी लढती होत आहेत. कोकीसरे मतदार संघात ठाकरे शिवसेनेच्या माजी सभापती शुभांगी उर्फ माई सरवणकर विरुद्ध माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या सुन तर करुळ गावचे माजी पंचायत समिती सदस्य अरुण उर्फ बाळा कदम यांची सुकन्या भाजपाच्या श्रावणी रावराणे या दोघीमध्ये लढत होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केलेली विकास कामे, भाजपा कार्यकर्त्यांची असणारी मोठी फळी यावरुन भाजपच्या श्रावणी रावराणे ह्या माजी सभापती यांना तगडे आव्हान देणार आहेत. तर माझी सभापती सरवणकर यांनी सभापती पदाच्या काळात केलेल्या कामाच्या जोरावर या दोघींमध्ये चांगलीच लढत होणार आहे.
जिल्हा परिषद लोरे मतदार संघात माजी जिल्हा परिषद सदस्या ठाकरे शिवसेनेच्या दिव्या पाचपुते विरुद्ध भाजपच्या रिद्धी सुतार यांच्यामध्ये दुहेरी लढत होत आहे. दिव्या पाचकुडे या माजी जिल्हा परिषद सदस्य असल्या तरी या मतदारसंघात असणारे ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही महिन्यापूर्वी भाजपात केलेला प्रवेश व भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी असणारी फळी, मोठा जनसंपर्क आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी या मतदारसंघात केलेली विकास कामे यांच्या जोरावर रिद्धी सुतार यांची उमेदवारी मात्र दिव्या पाचकुडे यांना जड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्हा परिषद मतदार संघात निवडणुकीमध्ये चांगली रंगत येणार आहे.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.