loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर खार कोलेटीवाडी येथे भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

संगलट, खेड( इक्बाल जमादार) - मुंबई–गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील खार कोलेटीवाडी येथे भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वडखळ पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खार कोलेटीवाडी येथील साक्षी ऑटो गॅरेजसमोर हा अपघात झाला. मयत बाळकृष्ण जनार्दन भोईर (वय ४६, रा. मालाड पूर्व, मुंबई; मुळ रा. तळेखार, ता. मुरुड) हे बजाज डिस्कव्हर (एम.एच. ०२ सीसी ७४६०) दुचाकीवरून नागोठणे बाजूकडून वडखळकडे जात असताना त्यांच्या दुचाकीची चैन तुटली, त्यामुळे त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला घेतले असता, पाठीमागून येणाऱ्या टाटा टेम्पोने (एम.एच. ०४ एल वाय ०९१२) त्यांना जोराची धडक दिली.

टाइम्स स्पेशल

या अपघातात बाळकृष्ण भोईर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. टेम्पो चालक चांद उस्मान शेख (वय ५३, रा. अस्लम नगर, बाला कंपाउंड, भिवंडी) याने भरधाव वेगाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फिर्यादी विनोद जगन्नाथ ठाकूर (रा. कोलेटीवाडी, ता. पेण) यांच्या तक्रारीवरून वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक फौजदार महेश मधुकर ठाकूर हे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg