loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक , चिकन मटण जेवणाचा फक्कड बेत ; निवडणुकीच्या प्रचारात जेवणावळीवर भर

लांजा,दि.२४ जानेवारी ( वार्ताहर) :- पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारांनी जेवणावळीवर भर दिला असून गणनिहाय बैठकांसाठी जंगी भाषणाबरोबरच चिकन..मटण जेवणाचा फक्कड बेत आखल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. उमेदवारांच्या प्रचाराचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. सर्व गावात पोहोचण्याबरोबर गावागावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या एकत्र बैठका घेऊन उमेदवारांची ओळख करून देण्यात येत आहे.याच बैठकांसाठी जेवणाचा फक्कड बेत आखण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा पूर्व विभागात एका जिल्हा परिषद गटात ४०० लोकांसाठी मोठी जेवणावळ आयोजित केल्याची चर्चा आहे. अशाच जेवणावळ गटनिहाय नियोजित होत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी मंडळी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. एकदाच जेवण घालून सर्व बाजू आपल्यासारखी करण्याचा प्रयत्न असल्याचे चर्चिले जात आहे. फक्कड जेवणामुळे सारेजण खुश होत असल्यामुळे हा सारा तामजाम करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg