loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली-भेडशी पं.स. मधून काँग्रेसचे संदीप नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

साटेली भेडशी (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. साटेली-भेडशी पंचायत समिती मधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून घोटगे येथील संदीप नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी उमेदवारी अर्ज भरताना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणारे संदीप नाईक हे एकमेव उमेदवार आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्जावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांची उपस्थिती बरेच काही सांगून जाणारी आहे. एकेकाळच्या प्रबळ काँग्रेसची स्थिती तालुक्यात कमकुवत झाली असली, तरी मित्रपक्षांच्या पाठिंब्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.ही जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg