सावंतवाडी (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक उमदे आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. त्यांनी तळागाळातील लोकांचा विचार करून विकासात मोठे योगदान दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोलाचा हातभार लागला आहे, अशा शब्दांत सावंतवाडीतील सर्वपक्षीय मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सावंतवाडी येथे आयोजित या श्रद्धांजली सभेत विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच अजितदादांच्या कामाच्या पद्धतीचा आणि त्यांच्या आश्वासक नेतृत्वाचा गौरव केला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, अजय गोंदावळे, विनोद सावंत, साक्षी वंजारी, गुरू मठकर, सदा कदम, उमाकांत वारंग, पुंडलिक दळवी, प्ररिक्षित मांजरेकर, पुनम नाईक, हिदायततुल्ला खान, नगरसेवक देवेंद्र टेमकर, रवींद्र म्हापसेकर, ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, शफीक खान, मंगलदास देसाई, समिर वंजारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले की, "मला अजितदादांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ते कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देत. सावंतवाडीत अनेकांना त्यांच्यासोबत काम करता आले. ते नेते असले तरी भेटायला येणाऱ्यांचे स्वतः आदरतिथ्य करत. सिंधुदुर्ग जिल्हा नकाशावर आला तो शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामुळेच. दीपकभाई नगराध्यक्ष असताना विकासकामांसाठी निधी देण्यात दादांनी मोठा पुढाकार घेतला होता." शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी "अजितदादा 'बोले तैसा चाले' या वृत्तीचे नेते होते," असे सांगून त्यांच्या कामाच्या वेगाचे कौतुक केले. तर बबन साळगावकर यांनी दादांच्या 'जनता दरबारा'ची आठवण सांगून, ते सामान्यांचे प्रश्न कसे तत्काळ सोडवत, याचा अनुभव कथन केला.
व्हिक्टर डॉन्टस यांनी बारामतीमधील विकासाचा दाखला देत, दादांनी जनसेवा आणि रोजगाराची गंगा कशी निर्माण केली, यावर प्रकाश टाकला. रूपेश राऊळ यांनी दादांच्या प्रशासकीय अभ्यासाचा उल्लेख करून त्यांच्या सतर्कतेचे कौतुक केले. श्रद्धांजली सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी मौन पाळून अजितदादांना आदरांजली वाहिली. यावेळी संजू परब, साक्षी वंजारी, शर्वरी धारगळकर, अजय गोंदावळे, ॲड. दिलीप नार्वेकर, पुंडलिक दळवी, उमाकांत वारंग यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.