loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकिसरे जि. प. मतदार संघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रावणी रावराणे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी (संजय शेळके) - कोकिसरे जि. प. मतदार संघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रावणी रावराणे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचार सभा असो वा घराघरातील भेटी, सर्वत्र मोठ्या प्रमाणात लोकसहभाग पाहायला मिळत असून मतदार संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रचारादरम्यान भाजपा शिवसेना शिंदे गट महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटित पद्धतीने प्रचार करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक वाडी व प्रत्येक घरापर्यंत पोहोचून श्रावणी रावराणे यांचा विकासाचा अजेंडा आणि महायुतीची धोरणात्मक भूमिका मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्नांवर भर देण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी याबाबत ठोस विकासात्मक दृष्टिकोन मांडण्यात आला. आगामी काळात सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन मतदारांना देण्यात येत आहे. श्रावणी रावराणे ह्या माजी वित्त बांधकाम सभापती केंद्र रावराणे यांच्या सुनबाई तर माजी प. स. सदस्य अरुण उर्फ बाळा कदम यांची कन्या आहे. तर या मतदारसंघात करूळ गाव येत असून करूळ गावात माहेर असल्याने करूळगाव श्रावणी रावराणे यांच्यामागे ठामपणे उभा राहणार असल्याचेही समजते तर श्रावणी रावराणे यांच्या प्रचारासाठी ग्रामस्थांकडून प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास दिसून येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg