loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवडे पंचायत समितीमधून भाजपाचे राजेश सावंत बिनविरोध

कणकवली (प्रतिनिधी) - पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जोरदार झटका दिला असून वरवडे पंचायत समिती मतदार संघातील मनसे आणि ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार राजेश उर्फ सोनू सावंत हे आता एकमेव उमेदवार राहिले आहेत. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची केवळ घोषणा होणे बाकी आहे. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आतापर्यंत तीन पंचायत समिती सदस्य बिनविरोध झाले आहेत. यामध्ये बिडवाडी पंचायत समितीमध्ये संजना राणे, वरवडे पंचायत समितीमध्ये राजेश सावंत तर वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे पंचायत समितीची जागा भाजपला बिनविरोध मिळाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी असून तोपर्यंत आणखी काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg