पनवेल (प्रतिनिधी) रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक २०२६ दिनांक ५ फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांनी बुधवारी उत्स्फूर्त व जल्लोषात उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे तसेच राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली ही अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ढोल-ताशांच्या गजरात व घोषणांसह रॅली काढण्यात आली. ही रॅली पनवेल तहसीलदार कार्यालयात पोहोचून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मंगळवारी केळवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून मंगेश वाकडीकर व वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातून कमला देशेकर यांनी, वावंजे पंचायत समिती गणासाठी आरती कुणाल काटे, चिंध्रण पंचायत समिती गणातून अंकुश खेर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवारांनी आज (बुधवार, दिनांक २१ जानेवारी) अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना आमदार प्रशांत ठाकूर, राज्य परिषद अरुणशेठ भगत, नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, नगरसेवक ऍड. प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, दशरथ म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील, प्रवीण खंडागळे, विश्वजीत पाटील, ज्ञानेश्वर घरत, योगेश लहाने, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, यतीन पाटील, विनोद घरत, सुनील माळी, अनेश ढवळे, शिल्पा म्हात्रे, अपेक्षा जाधव, लीना पाटील, गौरी पाटील, प्रियांका गाताडे, सुजाता घरत, अंकिता घरत, दिक्षा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रायगड जिल्हा परिषदेतील नेरे जिल्हा परिषद गणातून आत्माराम बाळू भस्मा, पाली देवद गणातून प्राची अमित जाधव, पळस्पे गणमधून हर्षदा अतुल घरत, वावेघर गणातून अनन्या अविनाश गाताडे, वडघर मधून सोनाली प्रकाश जितेकर, तर गव्हाण जिल्हा परिषद मतदार संघातून निकिता निलेश खारकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पनवेल पंचायत समिती मधील नेरे पंचायत समिती गणातून वर्षा सचिन केवारे, आदई पंचायत समिती भूपेंद्र सदाशिव पाटील, पालीदेवद वैशाली प्रविण सावंत, विचुंबे निलम प्रमोद भिंगारकर, पळस्पे गणातून राजेंद्र हरिचंद्र पाटील, कोन मधून योगिता योगेश लहाने, पोयंजे गणामधून अस्मिता अनंत पाटील, वावेघर संघातून राजू पाटील, करंजाडे रंजना सदाशिव वास्कर, वडघर मधून मनिषा गजानन पाटील, वहाळ गणामधून वितेश त्रिंबक म्हात्रे, गव्हाण गणातून जिज्ञासा मनोहर कोळी, केळवणे मधून शीतल अनंता माळी तर आपटा पंचायत समितीमधून मयूर शेलार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. उमेदवारी अर्जाची छाननी २२ जानेवारी रोजी होणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून व्ही. के. हायस्कूल, पनवेल येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.





































































































































































































































.jpg)






















































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.