loader
Breaking News
Breaking News
Foto

शालांत परीक्षा व्याख्यानमाला आयुष्याला कलाटणी देणारी : पोलीस उपनिरीक्षक केंद्रे

खेड : संकल्प सामाजिक सेवा प्रतिष्ठान आयोजित शालांत परीक्षा व्याख्यानमाला ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे. म्हणूनच या व्याख्यानमालेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन येथील पोलीस उपनिरीक्षक रोहीदास केंद्रे यांनी केले. भरणे येथे सभागृहात संकल्प सामाजिक सेवा प्रतिष्ठान, तुर्भे, नवीन मुंबईच्या वतीने आयोजित शालांत परीक्षा व्याख्यानमालेच्या उद्घाटनपर मनोगतामध्ये ते बोलत होते. श्री. केंद्रे पुढे म्हणाले, शालांत परीक्षेची तयारी कशी करायची? प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, अभ्यास कसा करायचा? याची तयारी वर्षभर शाळेत आपले शिक्षक आपल्याकडून करून घेत असतात तर व्याख्यानमालेत महत्वाचे मुद्दे कसे हाताळायचे या पद्धतीचे ज्ञान दिले जाते. आपल्या शिक्षकांनी व शालांत परीक्षा व्याख्यानमालेतील तज्ञ शिक्षकांनी सुसंवाद साधून परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन केंद्रे यांनी केले. या वेळी उद्योजक उत्तमकुमार जैन, डॉ. राजेश ओतुरकर, संस्थाध्यक्ष अशोक सकपाळ आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg